मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उंबरठा

  'उंबरठा' व्यंकटेश माडगूळकर पाने: १४६ व्यंकटेश माडगूळकर म्हटलं की ग्रामीण जीवन आणि जंगल या दोन्हींचे सुरेल मिश्रण गृहीत धरायचं. उंबरठा त्याला अपवाद नाही. रोमान्स पण ग्रामीण, उपेक्षित पण ग्रामीण, पाटलाची दांडगाई ती पण ग्रामीण आणि मध्येच जंगलात उडी. नुसती उडीच नाही तर थरकाप. कोणी जर ५ मिनिटे ही जंगलात वाट हरविण्याचा अनुभव घेतला असेल तर जाणवेल की निबीड अरण्यात जिथे जंगली अजस्त्र गवे वास्तव्य करतात अशा जंगलात जखमी गव्याच्या मागावर असताना जाणकार माणूसच रस्ता चुकला आणि खोल खोल जात राहिला आणि अचानक लक्षात आलं की आपण तर गव्यांच्या जाण्यायेण्याच्या वाटेत उभे आहोत, तर! अशा रोमहर्षक कथांच्या मधोमध असताना आपण उंबरठा ओलांडून व्यंकटेश माडगूळकरांच्या ग्रामीण जीवनात आणि घनदाट जंगलात कधी पाऊल टाकतो आणि समरस होऊन जातो ते लक्षात ही येत नाही. आणखी काय सांगावे. स्वतः वाचून अनुभव घ्यावे धवल रामतीर्थकर सीवुडस, नवी मुंबई

द ग्रेट गेम १९१७ - मध्यपूर्वेची रक्तलांच्छित शताब्दी

  द ग्रेट गेम १९१७ - मध्यपूर्वेची रक्तलांच्छित शताब्दी लेखक - जयराज साळगावकर प्रकाशन - परम मित्र आता परिचय लिहीत आहे म्हणजे प्रत्येक परिचय चांगलाच असणार, म्हणजे पुस्तकाला चांगलं म्हणलेलाच असणार असं नाही. काही पुस्तके मनापासून आवडतात, भावतात, आपण त्यात स्वतः ला विसरून जातो, तर कधी कधी आपण अशी पुस्तके खूप अपेक्षेने निवडतो व वाचताना जाणवते की अरेच्चा दुसरे पुस्तक घेतले असते तर बरं झालं असतं. द ग्रेट गेम हे असंच दुसऱ्या श्रेणीतले पुस्तक वाटले. खरं तर विषय अत्यंत उत्कंठावर्धक आहे. मध्यपूर्वेचा इतिहास! पण सुरुवातीला प्रस्तावना वाचताना याची कुणकुण लागते कारण प्रस्तावना लिहिणाऱ्या प्रसिद्ध इतिहास लेखकाने नमूद केले आहे की यात थोडी गडबड झाली आहे. इतिहासात अत्यंत महत्वाचे काही असते तर ते काळाप्रमाणे मांडणी करणे. ते जर व्यवस्थित नसेल तर इतिहासच गडबडून जातो. त्यात परत लेखक इतक्या खोलात गेले आहेत, प्रत्येक माणसाचे नाव, छोट्या छोट्या दैनंदिन घटना व अशा गोष्टींमुळे सलग 'link' अशी कधी लागलीच नाही व मध्यर्वेचा पूर्ण इतिहासही कळाला नाही. रियासतकार गोविंद सरदेसाई, किंवा वि.स.वाळिंबे यांसारखी इ...

जंगलाचं देणं

  पुस्तक: जंगलाचं देणं लेखक: मारुती चितमपल्ली पाने: १३५ प्रकाशन: साहित्य प्रसार केंद्र, नागपूर पुरस्कार: महाराष्ट्र राज्य साहित्यिक पुरस्कार (१९८९), विदर्भ साहित्य संघ पुरस्कार (१९९१) आता मारुती चितमपल्ली म्हटलं की जंगल, आणि जंगल म्हटलं की मारुती चितमपल्ली हे समीकरण पक्कं झालं आहे. म्हणतात त्यांना पक्षीतज्ज्ञ, पण आहेत ते जंगलतज्ज्ञ. त्यात परत नवेगावची इंच इंच भूमी, एक एक पण, छोट्याला छोटा खडा, तळे, पक्षी, प्राणी आणि आदिवासीही त्यांच्या परिचयाची. त्याव्यतिरिक्त ते ज्या ज्या ठिकाणी (म्हणजेच जंगलात) रुजू होत, ती ती भूमी (जंगल) पालथे घालत. यातूनच साकार झाले आहे 'जंगलाचं देणं' एकाहून एक जंगलाशी समरस होऊन जाऊ अशा जंगलातल्या कथा, प्राण्याविषयी, पक्ष्यांविषयी, डोहांविषयी, आदिवासींविषयी, पाटीलांविषयी. आपल्यासारख्ये शहरी जीवनात अडकलेल्यांनी कधी कल्पना ही काली नसेल असे अनुभव. एकूण भन्नाट २७ अनुभवांमधील दोन अनुभव मला खास भावले. पहिले 'टेकराज'. आजकाल वारूळे नामशेष झालीत असे वाटत. हीच वारुळे जेव्हा खणली जातात तेव्हा खाली एक अद्भुत जग असते. या वाळवीच्या जगात सगळे कसे साचेबद्ध असते, ...

पडघवली

  'पडघवली' लेखक - गो नी दांडेकर पाने- २२२ प्रकाशन- मौज - आज बाई सारवा, उद्या बाई तारवा - इवलं हातावर हागल्याशिवाय डोळ्यात फुंकरसुद्धा घालायची नाही - माकड गेलं लुटी नि आणल्या दोन मुठी - फाशांचा डाव नि दैवाचा घाव - पायावर पाणी घाल म्हटलं, तर तोरड्या किती तोळ्याच्या... - भित्री भागुबई, चुलीशी बसुबाई - पोरीत पोरगा लोंबडा... - फट म्हणता सन्याशी मरायचा! - नागव्यांच्या गावी पितांबारची पेठ - आपलं घर नि शेणाने भर कोकण म्हटलं की सगळंच निराळं. कोकणचे पाणी असो, माणसं असो किंवा त्यांची शिवराळ वाटणारी भाषा. पुस्तकातील वरील काही कोकणी म्हणींवरून त्याचा प्रत्यय आला असेलच. पण कोकणाची खरी ओळख करून घ्यायची असेल तर 'पडघवली' वाचावे. पडघवली हे एक पुस्तक नाही तर काही वर्षांपूर्वीच्या कोकणाचे चलचित्र आहे. एक एक पान म्हणजे एक एक सीन वाटतो. सुरुवात शिवाजी महाराजांच्या काळातील कोकणात होते. कसे अंजनवेलीच्या किल्लेदाराकडे कारकून असलेल्या केशवभटांनी स्वतः चे रक्त सांडून सिद्दी च्या मुसलमानी चाच्यांची खोड मोडून कोकणातील गणपतीपुळे, गुहागर, अंजनवेल असा परिसर हिंदूंसाठी सुरक्षित केला. बक्षीस म्हणून ...

मॅन हंट

  पुस्तक: मॅन हंट लेखक: पीटर बर्गन अनुवाद: रवी आमले पाने: २२८ ९/११, ट्विन टॉवर आणि बिन लादेन हे समीकरण कायमचे लक्षात राहणारे. आता यात आणखी एक पक्ष म्हणजे अमेरिका. आणि चुकांचा, खोटेपणाचा इतिहास लाभलेल्या या देशाने सांगितलेल्या गोष्टीत किती तथ्य आणि किती मिथ्य आहे हे सांगणे कठीण. विशेष करून जेव्हा आपण हे सत्य जाणतो की कसे अमेरिकाने खोटी नाटी कारणे सांगून इराक सारख्या अरब देशाची वाट लावली आणि तेथून पुढे मध्य आशियात अशाच खोट्या कारवाया करून अशांतता पसरवली आणि लाखो लोकांचा जीव घेतला. असो, तर ही आहे बिन लादेनच्या शोधाची थोडीफार थरारक कथा. कथा सुरु होते लादेनने अमेरिकेसारख्या सुपरपॉवर ची शान असलेले ट्वीन तोवर बेचिराख केल्याच्या घटनेनंतर. स्वाभिमान ही अतिशय नाजूक गोष्ट असते. आणि देशाचा स्वाभिमान म्हणजे नाजूक तसेच अतिशय दबाव आणणारी गोष्ट. त्यालाच जर का ठेच लागली तर अमेरिकेसारखा बलाढ्य, घमंडखोर देश आकाश-पाताळ एक करून ठेच लागलेल्या कारणाला समाप्त केल्याशिवाय राहणार नाही हे उघडच. अतोनात पैसे आणि अमेरिकेची गोरी माणसे खर्चून ही मोहीम सुरु होते अफगाणिस्तानमध्ये.आपल्या प्रगत तंत्रज्ञानाच्या आणि...