मी नर्मदा परिक्रमेबद्दल बरंच वाचलं आहे, करायची इच्छा आहे. माझा एक प्रिय मित्र दोनदा दीर्घ काळ परिक्रमा करून आला आहे. भारती ठाकूर यांनी लिहिलेलं पुस्तक बऱ्याच महिन्यांपासून वाचायचं होतं आणि ते मागच्या आठवड्यात आपसूक माझ्या झोळीत पडलं. पुस्तक उघडलं आणि आत जाडजूड, बोल्ड अक्षरं बघून एकदम वाचणे नकोसं वाटलं. पण विषयाची, नर्मदा मैय्याची आणि भारती ठाकूर यांच्या अनुभवाची ओढ इतकी होती की त्या अप्रिय अक्षर छपाईकडे दुर्लक्ष केलं गेलं. कोठेही आळोखेपिळोखे नाही, डायरी लिहिल्यासारखं पण वाचकांना गुंतवून ठेवणारं मृदू लिखाण आहे. मला यात सर्वात भावलेली गोष्ट म्हणजे त्यांनी निर्माण केलेली 'सखी', म्हणजेच त्यांचे अंतरमन. या सखीशी वेळोवेळी त्यांनी केलेले हितगुज, गप्पा, आठवणी आणि शिकवण लक्षण राहणारी आहे, जसे आपणही बऱ्याच आपल्याशीच बोलतो तसे. कोठेही अहंकार भाव नाही, मी मी पणा नाही, मोठेपणा नाही पण सरळ अनुभवांचे सुरेख वर्णन. जशी नर्मदा मैय्याची अनेक रूपे आहेत तसेच त्यांना परिक्रमेत भेटलेली माणूस या प्राण्याची विविध रूपे भारती ठाकूर यांनी आपल्यासमोर उभी केली आहेत. छोटे पण सुटसुटीत आणि नर्मदा परिक्रमेची ...