पुस्तक : Why don’t you fly? - Backdoor to Beijing by Bicycle लेखक : क्रिस्तोफर स्मिथ पाने: २७४ माझ्यामते प्रवासवर्णन लिहिणे ही एक अतिशय अवघड गोष्ट आहे. कारण प्रवास जेवढा रोमहर्षक असतो त्या तोडीचे लिखाण घडत नाही जे तिर्हाईताला वाचावेसे वाटेल, गुंतवून ठेवेल. आणि त्यात परत सायकल प्रवासवर्णन असेल तर आणखीनच अवघड कारण लहानपणी जे सायकलशी नाते तुटलेले असते ते आयुष्यभर तसेच राहते. आणि म्हणूनच इंग्लंड ते चायना या सायकल प्रवासाचे वर्णन करणारे हे पुस्तक मला फार आवडले. (तसे मीही डोंबिवली ते कोकणात हर्णे आणि परत असे ५०० कि. सायकलिंग केले आहे) पुस्तक आवडले कारण क्रिसोफरने प्रवासाचा खिस न काढता अतिशय ओघवत्या रीतीने लिहिले आहे. जसा त्याचा प्रवास पुढे सरकत जातो तसेच पुस्तकही आपसूक पुढे पुढे सरकत जाते, मध्ये कोठे अडकत नाही, अडखळत नाही. कंटाळवाणेही होत नाही. इंग्लंड मधून सुरु करून त्याने युरोप पार केले, मग इराण मध्ये शिरला, तेथील वाळवंट आणि कठोर परिसर पार करत अफगाणिस्तानच्या डोंगर दऱ्यातून पाकिस्तानमध्ये गेला. तेथे दहशतीने ग्रासलेल्या बलुचिस्तान प्रांतातून तो हिंदुस्तानात आला, आणि अमृतसर ते कन्याकुम...