मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

१९६५ युद्ध - हिंदुस्थानचा विजय. पाकिस्तान खच्ची.

हिंदुस्थान आणि युद्धे म्हटलं की दोन युद्धे लगेच आठवतात , रामायण आणि महाभारत! त्यानंतर आठवतात ती नेहरूंच्या बावळटपणामुळे आणि अहंकारामुळे चीन कडून सपाटून मार खाललेले १९६२ चे युद्ध आणि पाकिस्तानचा माज उतरवून त्याचे सरळ दोन भाग केलेले १९७१ चे बांगलादेश मुक्ती युद्ध.   पण या दरम्यान एक अतिशय नाजूक आणि महत्वाचे युद्ध झाले होते , अर्थात पाकिस्तानबरोबरच. या युद्धाने हिंदुस्थानला यश दिले , आत्मविश्वास दिला आणि भविष्याकडे वाटचाल करण्याची निश्चित दिशा दाखवली. आणि ते युद्ध आहे १९६५ चे हिंदुस्थान - पाकिस्तान युद्ध! हिंदूंची हत्या करून ,  हिंदूंना बंदुकीच्या आणि हिंसेच्या दहशतीखाली काश्मीर सोडायला लावलेले काश्मीर आपले आहे असा बालबुद्धीचा समाज कायमच पाकड्यांनी केला आहे. याच बालहट्टापायी १९४७ चे काश्मीर मुक्ती छोटेखानी युद्ध झाले होते. त्याचीच पुनरावृत्ती म्हणजे १९६५. आपल्याला चीन कडून हार पत्करून जेमतेम तीन वर्षे झाली होती. १९४७ पासून शांततेची डोळ्यावर झापड होती ते डोळे खाडकन उघडले गेले होते. सेनेची पुनर्रचना चालू होती , अमेरिकेकडून पाकिस्तानला अत्याधुनिक शस्त्रे पुरवली जात होती आणि यातच ह...

गाणाऱ्याचे पोर

पुस्तक: गाणाऱ्याचे पोर लेखक: राघवेंद्र भीमसेन जोशी पाने: १८७ पंडित भीमसेन जोशींचे स्वर्गीय स्वर ज्याने कधी ऐकले असतील तर ते विसरणे केवळ अशक्य! अशा व्यक्तीच्या मुलानेच जर आपल्या वडिलांबद्दल पुस्तक लिहिले तर जवळच्या व्यक्तीला ज्या गोष्टी, जे कंगोरे जे क्षण माहिती असतील ते इतर कोणाला कळणे शक्य नाही. म्हणूनच मला पुस्तक आवर्जून वाचावेसे वाटले. वाटले की भीमसेन जोशींच्या सवयी, आवड- निवड,रियाज, गाण्यामागचे रहस्य, शिकण्याचा काळ वगैरे वगैरे गोष्टी कळतील. पण पुस्तक वाचायला लागलो आणि एक गोष्ट लक्षात यायला लागली की हे पुस्तक पंडित भीमसेन जोशींबद्दल मुळात नाहीच आहे. त्यांच्या मुलाने आपले गऱ्हाणे, आपली दुःखे, आपल्यावर झालेला अन्याय या गोष्टी जगासमोर आणण्यासाठी केलेला हा खटाटोप आहे. पंडित भीमसेन जोशी हे कलाकार म्हणून अतुलनीय असतील पण स्वतः च्या आयुष्यात त्यांनी चुका केल्या व त्यांचा पाढा म्हणजे हे पुस्तकं आहे. वास्तविक राघवेंद्र जोशी हे एक नावाजलेले 'पानाड्या' होते, म्हणजे जमिनीत पाणी कोठे लागेल हे ते अचूकपणे सांगत. संरक्षण विभागातले सुरक्षित नोकरी सोडून पूर्णवेळ वैराण, प्रसंगी खडकाळ पाणी शो...

Why don’t you fly? Backdoor to Beijing by Bicycle

पुस्तक :   Why don’t you fly? - Backdoor to Beijing by Bicycle लेखक : क्रिस्तोफर स्मिथ पाने: २७४ माझ्यामते प्रवासवर्णन लिहिणे ही एक अतिशय अवघड गोष्ट आहे. कारण प्रवास जेवढा रोमहर्षक असतो त्या तोडीचे लिखाण घडत नाही जे तिर्हाईताला वाचावेसे वाटेल, गुंतवून ठेवेल. आणि त्यात परत सायकल प्रवासवर्णन असेल तर आणखीनच अवघड कारण लहानपणी जे सायकलशी नाते तुटलेले असते ते आयुष्यभर तसेच राहते. आणि म्हणूनच इंग्लंड ते चायना या सायकल प्रवासाचे वर्णन करणारे हे पुस्तक मला फार आवडले. (तसे मीही डोंबिवली ते कोकणात हर्णे आणि परत असे ५०० कि. सायकलिंग केले आहे) पुस्तक आवडले कारण क्रिसोफरने प्रवासाचा खिस न काढता अतिशय ओघवत्या रीतीने लिहिले आहे. जसा त्याचा प्रवास पुढे सरकत जातो तसेच पुस्तकही आपसूक पुढे पुढे सरकत जाते, मध्ये कोठे अडकत नाही, अडखळत नाही. कंटाळवाणेही होत नाही. इंग्लंड मधून सुरु करून त्याने युरोप पार केले, मग इराण मध्ये शिरला, तेथील वाळवंट आणि कठोर परिसर पार करत अफगाणिस्तानच्या डोंगर दऱ्यातून पाकिस्तानमध्ये गेला. तेथे दहशतीने ग्रासलेल्या बलुचिस्तान प्रांतातून तो हिंदुस्तानात आला, आणि अमृतसर ते कन्याकुम...