पुस्तक : शिवछत्रपतींचे आरमार लेखक : गजानन भास्कर मेहेंदळे / संतोष प्र शिंत्रे पाने : १७७ आज जो महाराष्ट्र आहे तो शिवाजी महाराजांमुळे, त्यांच्या दूरदृष्टीमुळे, माणसे पारखण्याच्या आणि जोडण्याच्या कसबेमुळे. त्यांच्या अनेक लढाया गनिमी काव्याची अप्रतिम उदाहरणे आहेत. आणि अशा थोर व्यक्तीच्या कर्तबगारीविषयी, हुशारीविषयी आणि धोरणाविषयी कोणी लिहावे तर मेहेंदळे यांसारख्या इतिहासाच्या मुळापासून अभ्यास केलेल्या इतिहासकाराने. अशा या दोन अफलातून मिश्रणातून तयार झाले आहे ते हे पुस्तक. A diorama showing Maratha naval tactics, on display at the National Museum, New Delhi. | Nomu420 / CC BY-SA 3.0 १५वे - १६वे शतक हा असा काळ होता जेव्हा युरोपिअन सत्ता म्हणजे पोर्तुगीज, डच, ब्रिटिश आणि काही प्रमाणात अरब यांचे सागरावर स्वामित्व होते. हिंद महासागरात काही वेगळीपरीस्थिती नव्हती. तेव्हा तर कोकणही स्वराज्यात नव्हते, आदिलशाही आणि नंतर निजामशाहीत होते. अशा कठीण काळात शिवाजी महाराजांनी प्रथम कोकण मुक्त केले. याने काय झाले तर काही किनारे स्वराज्यात आले. यानंतर त्यांनी आपले आरमार उभे करण्यास सुरुवात क...