पुस्तक: जंगलाचं देणं लेखक: मारुती चितमपल्ली पाने: १३५ प्रकाशन: साहित्य प्रसार केंद्र, नागपूर पुरस्कार: महाराष्ट्र राज्य साहित्यिक पुरस्कार (१९८९), विदर्भ साहित्य संघ पुरस्कार (१९९१)
आता मारुती चितमपल्ली म्हटलं की जंगल, आणि जंगल म्हटलं की मारुती चितमपल्ली हे समीकरण पक्कं झालं आहे. म्हणतात त्यांना पक्षीतज्ज्ञ, पण आहेत ते जंगलतज्ज्ञ. त्यात परत नवेगावची इंच इंच भूमी, एक एक पण, छोट्याला छोटा खडा, तळे, पक्षी, प्राणी आणि आदिवासीही त्यांच्या परिचयाची. त्याव्यतिरिक्त ते ज्या ज्या ठिकाणी (म्हणजेच जंगलात) रुजू होत, ती ती भूमी (जंगल) पालथे घालत. यातूनच साकार झाले आहे 'जंगलाचं देणं'
एकाहून एक जंगलाशी समरस होऊन जाऊ अशा जंगलातल्या कथा, प्राण्याविषयी, पक्ष्यांविषयी, डोहांविषयी, आदिवासींविषयी, पाटीलांविषयी. आपल्यासारख्ये शहरी जीवनात अडकलेल्यांनी कधी कल्पना ही काली नसेल असे अनुभव.
एकूण भन्नाट २७ अनुभवांमधील दोन अनुभव मला खास भावले. पहिले 'टेकराज'. आजकाल वारूळे नामशेष झालीत असे वाटत. हीच वारुळे जेव्हा खणली जातात तेव्हा खाली एक अद्भुत जग असते. या वाळवीच्या जगात सगळे कसे साचेबद्ध असते, आणि त्यांच्या गाभ्यात जे वाळवीचे मुख्य जीवन स्रोत असते तो पांढरा जीव जर खाल्ला तर चिंतामपल्लींच्या मामांसारखे ८० व्य वयात ही नवतारूण्य सारखी स्फूर्ती प्राप्त होते हे ऐकूनही खरं वाटणार नाही.
आणि दुसरे म्हणजे सापाच्या आवाजाची. साप चावतात हे ,माहीत होतं, पण ते आवाज काढतात आणि जंगलातल्या शांततेत त्यांचा आवाज स्पष्ट ऐकू येतो (फक्त जाणकारांनाच). साप केवळ कोंबडी किंवा लाहुरी पक्ष्यासारखं ओरडतात असे नाही, तर ते जनावरांसारखेदेखील आवाज काढतात. उदाहरणार्थ बकरी ओरडते तसे बे S बे S बे. विश्वास नाही बसत ना
आणि म्हणूनच मारुती चितमपल्लींचे जंगलाचं देणं वाचणे क्रमप्राप्त होते.



टिप्पण्या