मुख्य सामग्रीवर वगळा

मॅन हंट

 पुस्तक: मॅन हंट लेखक: पीटर बर्गन अनुवाद: रवी आमले पाने: २२८



९/११, ट्विन टॉवर आणि बिन लादेन हे समीकरण कायमचे लक्षात राहणारे. आता यात आणखी एक पक्ष म्हणजे अमेरिका. आणि चुकांचा, खोटेपणाचा इतिहास लाभलेल्या या देशाने सांगितलेल्या गोष्टीत किती तथ्य आणि किती मिथ्य आहे हे सांगणे कठीण. विशेष करून जेव्हा आपण हे सत्य जाणतो की कसे अमेरिकाने खोटी नाटी कारणे सांगून इराक सारख्या अरब देशाची वाट लावली आणि तेथून पुढे मध्य आशियात अशाच खोट्या कारवाया करून अशांतता पसरवली आणि लाखो लोकांचा जीव घेतला.

असो, तर ही आहे बिन लादेनच्या शोधाची थोडीफार थरारक कथा. कथा सुरु होते लादेनने अमेरिकेसारख्या सुपरपॉवर ची शान असलेले ट्वीन तोवर बेचिराख केल्याच्या घटनेनंतर. स्वाभिमान ही अतिशय नाजूक गोष्ट असते. आणि देशाचा स्वाभिमान म्हणजे नाजूक तसेच अतिशय दबाव आणणारी गोष्ट. त्यालाच जर का ठेच लागली तर अमेरिकेसारखा बलाढ्य, घमंडखोर देश आकाश-पाताळ एक करून ठेच लागलेल्या कारणाला समाप्त केल्याशिवाय राहणार नाही हे उघडच.
अतोनात पैसे आणि अमेरिकेची गोरी माणसे खर्चून ही मोहीम सुरु होते अफगाणिस्तानमध्ये.आपल्या प्रगत तंत्रज्ञानाच्या आणि पैशाच्या जोरावर अमेरिका पुरस्कृत CIA बिन लादेनचा ठिकाणा शोधते - लपण्यासाठी असंख्य गुहांनी सज्ज असा तोरा बोरा पर्वत. पण घोळ घालायचा हा अमेरिकेचा हक्कच आहे. त्यामुळे कारवाई करण्यात वेळ निघून जाते आणि बिन लादेन तोरा बोरा पर्वतांमधून, अमेरिकेच्या वेढ्याला चुकवून पसार होतो ते थेट पाकिस्तानमध्ये.
अमेरिकेची लादेनविरुद्ध मोहीम सुरु करतो त्यांचा तेव्हाचा अध्यक्ष जॉर्ज बुश. पण पुढे सत्तांतर होऊन बाराक ओबामा अध्यक्ष बनतो. मधल्या काळात पैशांचे पाट वाहतात, लष्कर अथक प्रयत्न करते आणि बिन लादेनच्या अल कायदा संस्थेची माहिती काढून खूप हानी करते, अनेक सरदारांना ड्रोनद्वारे टिपते. तरीही लंडनमध्ये अल कायदा अतेरिकी हल्ले चालूच ठेवते.
शेवटी बिन लादेन पाकिस्तानच्या अबोटाबाद जिल्ह्यात एका विस्तीर्ण घरं लपला आहे असा संशय येतो. अनेक महिने टेहळणी करूनही धूर्त बिन लादेन तिथेच आहे याची खात्री पटत नाही. पण शेवटी अमेरिका तिथे हल्ला करायण्याचा बेत पक्का करते आणि बॉम्बहल्ले, बिन भरवशाचे अचूक मारा करणारी छोटी क्षेपणास्त्र आणि कमांडो हल्ला या तीन पर्यायांमधून कमांडोना तिथे पाठवायचा पर्याय नक्की होतो. यानंतर सुरु होतो या नाट्याचा आणि बिन लादेनचा अंत. अशी सरळ गोष्ट आहे हे पुस्तक.
या दरम्यान अमेरिकेची तंत्रज्ञात किती प्रगती आहे ते दिसते. तसेच बिन लादेन अमेरिकेच्या हातात न सापडण्याची किती काटेकोर सुरक्षा नियम पाळतो ते ही समोर येते. तसेच पाकिस्तानचा दुटप्पीपणा, अतिरेक्यांना लपायला स्वतःची जमीन वापरू देणे आणि अमेरिकेचा पाकिस्तानशी असलेला निव्वळ व्यावहारिक संबंध हे ही ठळकपणे समोर येते.
रोमहर्षक असे या पुस्तकं फारसे काही नाही. शेवटचा बिन लादेनवरचा हल्लाच एवढेच काय ते उत्कंठा वाढवतो. पुस्तकातील कमीतकमी ५०-७० पाने कमी होऊ शकली असती असे मला तरी वाटते. रशियाशी वैर आहे म्हणून अमेरिकेने अफगाणी जिहाद्यांना शास्त्रे पुरवली. नंतर तेच जिहादी अतिरेकी अमेरिकेवर उलटले आणि मग त्यातल्या एकाला अमेरिकेने समाप्त केले.
जर तुम्हाला बिन लादेनबद्दल उत्सुकता असेल, युद्धकथांमध्ये रुची असेल आणि वेळ असेल तर हे पुस्तक वाचण्यास हरकत नाही. अन्यथा या विषयावर इतर चांगले विश्लेषण असलेली पुस्तके नक्की असणार त्याचा शोध घ्या आणि त्यातले एक वाचा. अमेरिकेने जे करायचे ते केले, आता आपण काय करायचे ते आपणच ठरवायचे.
धवल रामतीर्थकर
सीवूड्स, नवी मुंबई




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

द ग्रेट गेम १९१७ - मध्यपूर्वेची रक्तलांच्छित शताब्दी

  द ग्रेट गेम १९१७ - मध्यपूर्वेची रक्तलांच्छित शताब्दी लेखक - जयराज साळगावकर प्रकाशन - परम मित्र आता परिचय लिहीत आहे म्हणजे प्रत्येक परिचय चांगलाच असणार, म्हणजे पुस्तकाला चांगलं म्हणलेलाच असणार असं नाही. काही पुस्तके मनापासून आवडतात, भावतात, आपण त्यात स्वतः ला विसरून जातो, तर कधी कधी आपण अशी पुस्तके खूप अपेक्षेने निवडतो व वाचताना जाणवते की अरेच्चा दुसरे पुस्तक घेतले असते तर बरं झालं असतं. द ग्रेट गेम हे असंच दुसऱ्या श्रेणीतले पुस्तक वाटले. खरं तर विषय अत्यंत उत्कंठावर्धक आहे. मध्यपूर्वेचा इतिहास! पण सुरुवातीला प्रस्तावना वाचताना याची कुणकुण लागते कारण प्रस्तावना लिहिणाऱ्या प्रसिद्ध इतिहास लेखकाने नमूद केले आहे की यात थोडी गडबड झाली आहे. इतिहासात अत्यंत महत्वाचे काही असते तर ते काळाप्रमाणे मांडणी करणे. ते जर व्यवस्थित नसेल तर इतिहासच गडबडून जातो. त्यात परत लेखक इतक्या खोलात गेले आहेत, प्रत्येक माणसाचे नाव, छोट्या छोट्या दैनंदिन घटना व अशा गोष्टींमुळे सलग 'link' अशी कधी लागलीच नाही व मध्यर्वेचा पूर्ण इतिहासही कळाला नाही. रियासतकार गोविंद सरदेसाई, किंवा वि.स.वाळिंबे यांसारखी इ...

शिवछत्रपतींचे आरमार

पुस्तक : शिवछत्रपतींचे आरमार लेखक : गजानन भास्कर मेहेंदळे / संतोष प्र शिंत्रे पाने : १७७   आज जो महाराष्ट्र आहे तो शिवाजी महाराजांमुळे, त्यांच्या दूरदृष्टीमुळे, माणसे पारखण्याच्या आणि जोडण्याच्या कसबेमुळे. त्यांच्या अनेक लढाया गनिमी काव्याची अप्रतिम उदाहरणे आहेत. आणि अशा थोर व्यक्तीच्या कर्तबगारीविषयी, हुशारीविषयी आणि धोरणाविषयी कोणी लिहावे तर मेहेंदळे यांसारख्या इतिहासाच्या मुळापासून अभ्यास केलेल्या इतिहासकाराने. अशा या दोन अफलातून मिश्रणातून तयार झाले आहे ते हे पुस्तक. A diorama showing Maratha naval tactics, on display at the National Museum, New Delhi. | Nomu420 / CC BY-SA 3.0 १५वे - १६वे शतक हा असा काळ होता जेव्हा युरोपिअन सत्ता म्हणजे पोर्तुगीज, डच, ब्रिटिश आणि काही प्रमाणात अरब यांचे सागरावर स्वामित्व होते. हिंद महासागरात काही वेगळीपरीस्थिती नव्हती. तेव्हा तर कोकणही स्वराज्यात नव्हते, आदिलशाही आणि नंतर निजामशाहीत होते. अशा कठीण काळात शिवाजी महाराजांनी प्रथम कोकण मुक्त केले. याने काय झाले तर काही किनारे स्वराज्यात आले. यानंतर त्यांनी आपले आरमार उभे करण्यास सुरुवात क...

पडघवली

  'पडघवली' लेखक - गो नी दांडेकर पाने- २२२ प्रकाशन- मौज - आज बाई सारवा, उद्या बाई तारवा - इवलं हातावर हागल्याशिवाय डोळ्यात फुंकरसुद्धा घालायची नाही - माकड गेलं लुटी नि आणल्या दोन मुठी - फाशांचा डाव नि दैवाचा घाव - पायावर पाणी घाल म्हटलं, तर तोरड्या किती तोळ्याच्या... - भित्री भागुबई, चुलीशी बसुबाई - पोरीत पोरगा लोंबडा... - फट म्हणता सन्याशी मरायचा! - नागव्यांच्या गावी पितांबारची पेठ - आपलं घर नि शेणाने भर कोकण म्हटलं की सगळंच निराळं. कोकणचे पाणी असो, माणसं असो किंवा त्यांची शिवराळ वाटणारी भाषा. पुस्तकातील वरील काही कोकणी म्हणींवरून त्याचा प्रत्यय आला असेलच. पण कोकणाची खरी ओळख करून घ्यायची असेल तर 'पडघवली' वाचावे. पडघवली हे एक पुस्तक नाही तर काही वर्षांपूर्वीच्या कोकणाचे चलचित्र आहे. एक एक पान म्हणजे एक एक सीन वाटतो. सुरुवात शिवाजी महाराजांच्या काळातील कोकणात होते. कसे अंजनवेलीच्या किल्लेदाराकडे कारकून असलेल्या केशवभटांनी स्वतः चे रक्त सांडून सिद्दी च्या मुसलमानी चाच्यांची खोड मोडून कोकणातील गणपतीपुळे, गुहागर, अंजनवेल असा परिसर हिंदूंसाठी सुरक्षित केला. बक्षीस म्हणून ...