मुख्य सामग्रीवर वगळा

उंबरठा

 'उंबरठा' व्यंकटेश माडगूळकर पाने: १४६



व्यंकटेश माडगूळकर म्हटलं की ग्रामीण जीवन आणि जंगल या दोन्हींचे सुरेल मिश्रण गृहीत धरायचं. उंबरठा त्याला अपवाद नाही. रोमान्स पण ग्रामीण, उपेक्षित पण ग्रामीण, पाटलाची दांडगाई ती पण ग्रामीण आणि मध्येच जंगलात उडी. नुसती उडीच नाही तर थरकाप. कोणी जर ५ मिनिटे ही जंगलात वाट हरविण्याचा अनुभव घेतला असेल तर जाणवेल की निबीड अरण्यात जिथे जंगली अजस्त्र गवे वास्तव्य करतात अशा जंगलात जखमी गव्याच्या मागावर असताना जाणकार माणूसच रस्ता चुकला आणि खोल खोल जात राहिला आणि अचानक लक्षात आलं की आपण तर गव्यांच्या जाण्यायेण्याच्या वाटेत उभे आहोत, तर! अशा रोमहर्षक कथांच्या मधोमध असताना आपण उंबरठा ओलांडून व्यंकटेश माडगूळकरांच्या ग्रामीण जीवनात आणि घनदाट जंगलात कधी पाऊल टाकतो आणि समरस होऊन जातो ते लक्षात ही येत नाही. आणखी काय सांगावे. स्वतः वाचून अनुभव घ्यावे

धवल रामतीर्थकर
सीवुडस, नवी मुंबई

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

द ग्रेट गेम १९१७ - मध्यपूर्वेची रक्तलांच्छित शताब्दी

  द ग्रेट गेम १९१७ - मध्यपूर्वेची रक्तलांच्छित शताब्दी लेखक - जयराज साळगावकर प्रकाशन - परम मित्र आता परिचय लिहीत आहे म्हणजे प्रत्येक परिचय चांगलाच असणार, म्हणजे पुस्तकाला चांगलं म्हणलेलाच असणार असं नाही. काही पुस्तके मनापासून आवडतात, भावतात, आपण त्यात स्वतः ला विसरून जातो, तर कधी कधी आपण अशी पुस्तके खूप अपेक्षेने निवडतो व वाचताना जाणवते की अरेच्चा दुसरे पुस्तक घेतले असते तर बरं झालं असतं. द ग्रेट गेम हे असंच दुसऱ्या श्रेणीतले पुस्तक वाटले. खरं तर विषय अत्यंत उत्कंठावर्धक आहे. मध्यपूर्वेचा इतिहास! पण सुरुवातीला प्रस्तावना वाचताना याची कुणकुण लागते कारण प्रस्तावना लिहिणाऱ्या प्रसिद्ध इतिहास लेखकाने नमूद केले आहे की यात थोडी गडबड झाली आहे. इतिहासात अत्यंत महत्वाचे काही असते तर ते काळाप्रमाणे मांडणी करणे. ते जर व्यवस्थित नसेल तर इतिहासच गडबडून जातो. त्यात परत लेखक इतक्या खोलात गेले आहेत, प्रत्येक माणसाचे नाव, छोट्या छोट्या दैनंदिन घटना व अशा गोष्टींमुळे सलग 'link' अशी कधी लागलीच नाही व मध्यर्वेचा पूर्ण इतिहासही कळाला नाही. रियासतकार गोविंद सरदेसाई, किंवा वि.स.वाळिंबे यांसारखी इ...

शिवछत्रपतींचे आरमार

पुस्तक : शिवछत्रपतींचे आरमार लेखक : गजानन भास्कर मेहेंदळे / संतोष प्र शिंत्रे पाने : १७७   आज जो महाराष्ट्र आहे तो शिवाजी महाराजांमुळे, त्यांच्या दूरदृष्टीमुळे, माणसे पारखण्याच्या आणि जोडण्याच्या कसबेमुळे. त्यांच्या अनेक लढाया गनिमी काव्याची अप्रतिम उदाहरणे आहेत. आणि अशा थोर व्यक्तीच्या कर्तबगारीविषयी, हुशारीविषयी आणि धोरणाविषयी कोणी लिहावे तर मेहेंदळे यांसारख्या इतिहासाच्या मुळापासून अभ्यास केलेल्या इतिहासकाराने. अशा या दोन अफलातून मिश्रणातून तयार झाले आहे ते हे पुस्तक. A diorama showing Maratha naval tactics, on display at the National Museum, New Delhi. | Nomu420 / CC BY-SA 3.0 १५वे - १६वे शतक हा असा काळ होता जेव्हा युरोपिअन सत्ता म्हणजे पोर्तुगीज, डच, ब्रिटिश आणि काही प्रमाणात अरब यांचे सागरावर स्वामित्व होते. हिंद महासागरात काही वेगळीपरीस्थिती नव्हती. तेव्हा तर कोकणही स्वराज्यात नव्हते, आदिलशाही आणि नंतर निजामशाहीत होते. अशा कठीण काळात शिवाजी महाराजांनी प्रथम कोकण मुक्त केले. याने काय झाले तर काही किनारे स्वराज्यात आले. यानंतर त्यांनी आपले आरमार उभे करण्यास सुरुवात क...

पडघवली

  'पडघवली' लेखक - गो नी दांडेकर पाने- २२२ प्रकाशन- मौज - आज बाई सारवा, उद्या बाई तारवा - इवलं हातावर हागल्याशिवाय डोळ्यात फुंकरसुद्धा घालायची नाही - माकड गेलं लुटी नि आणल्या दोन मुठी - फाशांचा डाव नि दैवाचा घाव - पायावर पाणी घाल म्हटलं, तर तोरड्या किती तोळ्याच्या... - भित्री भागुबई, चुलीशी बसुबाई - पोरीत पोरगा लोंबडा... - फट म्हणता सन्याशी मरायचा! - नागव्यांच्या गावी पितांबारची पेठ - आपलं घर नि शेणाने भर कोकण म्हटलं की सगळंच निराळं. कोकणचे पाणी असो, माणसं असो किंवा त्यांची शिवराळ वाटणारी भाषा. पुस्तकातील वरील काही कोकणी म्हणींवरून त्याचा प्रत्यय आला असेलच. पण कोकणाची खरी ओळख करून घ्यायची असेल तर 'पडघवली' वाचावे. पडघवली हे एक पुस्तक नाही तर काही वर्षांपूर्वीच्या कोकणाचे चलचित्र आहे. एक एक पान म्हणजे एक एक सीन वाटतो. सुरुवात शिवाजी महाराजांच्या काळातील कोकणात होते. कसे अंजनवेलीच्या किल्लेदाराकडे कारकून असलेल्या केशवभटांनी स्वतः चे रक्त सांडून सिद्दी च्या मुसलमानी चाच्यांची खोड मोडून कोकणातील गणपतीपुळे, गुहागर, अंजनवेल असा परिसर हिंदूंसाठी सुरक्षित केला. बक्षीस म्हणून ...