हिंदुस्थान आणि युद्धे म्हटलं की दोन युद्धे लगेच आठवतात, रामायण आणि महाभारत! त्यानंतर आठवतात ती नेहरूंच्या बावळटपणामुळे आणि अहंकारामुळे चीन कडून सपाटून मार खाललेले १९६२ चे युद्ध आणि पाकिस्तानचा माज उतरवून त्याचे सरळ दोन भाग केलेले १९७१ चे बांगलादेश मुक्ती युद्ध.
पण या दरम्यान एक अतिशय नाजूक आणि महत्वाचे युद्ध झाले होते, अर्थात पाकिस्तानबरोबरच. या युद्धाने हिंदुस्थानला यश दिले, आत्मविश्वास दिला आणि भविष्याकडे वाटचाल करण्याची निश्चित दिशा दाखवली. आणि ते युद्ध आहे १९६५ चे हिंदुस्थान - पाकिस्तान युद्ध!
हिंदूंची हत्या करून, हिंदूंना बंदुकीच्या आणि हिंसेच्या दहशतीखाली काश्मीर सोडायला लावलेले काश्मीर आपले आहे असा बालबुद्धीचा समाज कायमच पाकड्यांनी केला आहे. याच बालहट्टापायी १९४७ चे काश्मीर मुक्ती छोटेखानी युद्ध झाले होते. त्याचीच पुनरावृत्ती म्हणजे १९६५. आपल्याला चीन कडून हार पत्करून जेमतेम तीन वर्षे झाली होती. १९४७ पासून शांततेची डोळ्यावर झापड होती ते डोळे खाडकन उघडले गेले होते. सेनेची पुनर्रचना चालू होती, अमेरिकेकडून पाकिस्तानला अत्याधुनिक शस्त्रे पुरवली जात होती आणि यातच हिंदुस्थान द्वेषी भुट्टो घराणे पाकिस्तान चालवू लागले. त्यांच्या हट्टापायी सेनाध्यक्ष अयुब खान याने मुजाहिद आणि पाकिस्तान सेनेचे जवान असे मिश्रण काश्मीर मध्ये घुसवायचा आणि काश्मीरी लोकांना बरोबर घेऊन हिंदुस्तानविरुद्ध बंड करून काश्मीर वेगळा करायचा असा बेत रचला. आणि सुरु झाले पाकिस्तान आणि हिंदुस्थान या दोन्ही देशांना नको असलेलं युद्ध!
या
युद्धाची काही ठळक वैशिष्ट्ये होती आणि त्यामुळे भविष्यात काय बदल घडले ते बघूया:
१.
अमेरिकेने पाकिस्तानला पुरवलेले अत्याधुनिक पॅटन रणगाडे आणि F-८६ विमाने याच्या जोरावर पाकिस्तानने
हिंदुस्तानाशी दोन हात कराचे साहस केले. पण खेम करण च्या युद्धात आणि इतर ठिकाणी
हिंदुस्थानच्या चिलखती दलाने पॅटनचा रणगाड्यांचा धुव्वा उडवला आणि तब्बल ४५० पॅटन
उध्वस्त केले.
२.
हिंदुस्थानने हे युद्ध जिंकल्यामुळे आणि पाकिस्तान कमकुवत झाल्यामुळे ईस्ट
पाकिस्तान ला हुरूप चढला आणि यातूनच पुढे १९७१ मध्ये त्यांनी उठाव केला आणि पाकिस्तान विभागून बांगलादेश
निर्माण झाला.
३. सेनेकडे अनेक वर्ष दुर्लक्ष केल्यामुळे पाहिजे तसे यश हिंदुस्थानाला मिळू शकले नाही. मनोबल कमी होते, गुप्तचर विभाग कमकुवत होता यामुळे पाकिस्तानला सपशेल पराभूत करून कायमचे नेस्तनाबूत शक्य होते पण झाले नाही.
असे हे किचकट युद्ध अत्यंत तन्मयतेने आणि अभ्यासपूर्ण वृत्तीने पत्रकार आणि संरक्षण समीक्षक नितीन गोखले यांनी आपल्यासमोर आणले आहे. यात जवळपास सर्वच पुस्तकांमध्ये असलेली मूळभूत त्रुटी म्हणजे वेळोवेळी नकाशे न देणे. पण जोमेची बाजू अशी की आपल्याला १९६५ मध्ये मुख्य काय घडत होते ते स्पष्टपणे डोळ्यासमोर उभे राहते. आणि तीच या पुस्तकाची जोमेची बाजू आहे. उत्कृष्ट, मुद्देसूद मांडणी आहे. थोडे तांत्रिक असले तरी उत्कंठा कायम राहते. १९६५ चा हिंदुस्थान विजय लोकांसमोर आणल्याबद्दल नितीन गोखले यांचे अभिनंदन!
#वाचनवेडा
धवल
रामतीर्थकर
सीवूड्स,
नवी मुंबई
टिप्पण्या